राफेल प्रकरणी राहुल गांधींचे आरोप निरर्थक- हंसराज अहीर

Foto

औरंगाबाद: सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणात केंद्र सरकारला क्लीन चीट देऊनही काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. सरकार राफेलवर लोकसभेत चर्चा करण्यास तयार आहे. परंतु राहुल गांधी कुठलाही पुरावा नसताना नरेंद्र मोदींवर निरर्थक आरोप करत आहे. असे वक्तव्य केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी केले. औरंगाबाद येथे सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

राफेल करारात सरकार व केंद्रीय मंत्र्यांकडून कोणतीही अनियमितता झालेली नाही. कोणतेही पुरावे नसताना काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी पाकिस्तान व नक्षलींची भाषा बोलून षडयंत्र करीत आहे. अंतर्गत सुरक्षेचा हा प्रश्न आहे. शेजारी शत्रु देश राष्ट्राला बळ मिळेल असे वक्तव्य करून काँग्रेसचे नेते बेछूट आरोप करत आहे असा आरोप अहीर यांनी केला.

यावेळी आमदार अतुल सावे, भाजप सरचिटणीस संजय फतेलश्कर, शिरीष बोराळकर, अनिल मकरीये, बसवराज मंगरूळे, राम बुधवंत, डॉ. शाकेर राजा आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.